Kallappanna Awade Ichalkaranji Janata Sahakari Bank Ltd.

आरटीजीएस सेवा

आधुनिक सेवा व सुविधा

आपणास सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की, दि.३.३.२०११ इ. रोजीपासून बँकेच्या सर्व खातेदारांचेकरिता बँक्स एटीएम सुविधा, अँट पार चेक सुविधा व आरटीजीएस सुविधा सुरु करीत आहोत. बँकेने या पूर्वीच कोअरबँकिंग प्रणाली सुरु केली असून आमच्या बँकेच्या खातेदारांना आमच्या बँकेच्या कोणत्याही शाखेतून पैसे काढता अगर भरता येतात. त्यामुले ग्राहकांची फार मोठी सोय झालेली आहे. कोअरबँकिंग बरोबरच इतर सर्व आधुनिक सुविधा आम्ही टप्याटप्याने सुरु करीत आहोत. त्यातील एक भाग म्हणजे दि.३.३.२०११ इ. रोजीपासून सुरु झालेल्या बँक्स एटीएम सुविधा, अँट पार चेक सुविधा व आरटीजीएस सुविधा होय.या सुविधांचा लाभ खातेदारांनी घेण्याकरीता संबंधित शाखेमध्ये भेट द्यावी व यासाठी आवश्यक असणा-या फॉर्म्सची पूर्तता करावी. याबाबत अधिक माहिती खालिल प्रमाणे.

RTGS (Real Time Gross Settlement)

RTGS म्हणजे (Real Time Gross Settlement) होय. ही यंत्रणा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नियंत्रित करते. पूर्वी परगावांचे व परराज्यांचे चेक वसुलीसाठी खुपच विलंब लागत असे. ग्राहकांना जलद पैसे ट्रान्सफर करण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या पुढाकाराने आरटीजीएस सुविधा सुरु झाली आहे. आता आमच्या बँकेतून भारतातील कोणत्याही आरटीजीएस सुविधा असलेल्या बँकेच्या कोणत्याही शाखेत त्वरित पैसे पाठविता येतात. या आरटीजीएस सुविधा प्रणाली मध्ये भारतातील एकूण १०७ बँका समाविष्ट असून ७४०६२ शाखाच्यामध्ये फंड ट्रान्सफर करता येतात.

सोमवार ते शनिवार - 10.30 ते 05.30 (RTGS/NEFT)

आरटीजीएस / एनइएफटी विषयी कोणतीही समस्या असल्यास ईमेल करा -

मराठी