Kallappanna Awade Ichalkaranji Janata Sahakari Bank Ltd.

Hon. Founder Chairman, Kallappanna Awade (Dada)

मा. कल्लाप्पाण्णा आवाडे (दादा). संस्थापक अध्यक्ष
एका शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेल्या श्री कल्लाप्पाण्णा आवडे यांनी त्यांच्या युवा अवस्थेमध्येच सामाजिक कार्यामध्ये आपले अस्तित्व तयार केले. इचलकरंजी येथील सहकारी संस्थांच्या सहकार्याच्या माध्यमातून त्यांनी आपल्या समाज कार्यास सुरुवात केली. ५० वर्षाच्या कार्यकाळामध्ये बँकेचे संस्थापक चेअरमन म्हणून त्यांच्या अविरत प्रयत्नामुळे बँकेस उतुंग यश प्राप्त झाले.

१९६३ पासून १९७६ अखेर त्यांनी संस्थापक चेअरमन म्हणून या बँकेची धुरा संभाळली. त्यांच्या चेअरमन पदाच्या कारकीर्दीमध्ये त्यांनी बँकेसाठी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या अनमोल मार्गदर्शनामुळे बँकेस मोठे योगदान प्राप्त झाले आणि त्याचे फलित म्हणून पुढे महाराष्ट्रातील अग्रगण्य शेड्युल्ड सहकारी बँक म्हणून ही बँक नावारुपास आली. त्यांनी दिलेल्या प्रेरणेमुळे अद्ययावत तंत्रज्ञानाचा अवलंब करून ग्राहकांची विश्वासार्हता संपादन करून एक ग्राहकाभिमुख बँक म्हणून उदयास आली आहे.

चेअरमनपदाचा कार्यभार सांभाळत असतांना दादांनी बँकेची प्रगती, विकास आणि वृद्धी यासाठी अविश्रांत परिश्रम घेतले आणि त्यांच्या दुरगामी विचारांमुळेच अगदी सुरुवातीपासून बँकेबद्दल जनमानसात विश्वासाचे अतूट नाते निर्माण झाले आहे व “माणसांच्या मनांना विणणारी बँक” म्हणून नावारुपास आली. त्यांनी ग्राहकांना अद्ययावत सेवा सुविधा प्राप्त करून देणेसाठी घेतलेल्या ध्यासामुळे अल्पावधीतच बँक लोकाभिमुख झाली. सध्या बँकेने सर्वच क्षेत्रात जी उतुंग भरारी व प्रगती केलेली आहे, ती त्यांनी आजपर्यंत घेतलेल्या अविरत परिश्रमाचे व अनमोल मार्गदर्शनाचे फलित आहे.

इचलकरंजी नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदावरून त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीस सुरुवात केली आणि नंतर आमदार, खासदार व मंत्रीपदापर्यंत घोडदौड करून प्रामाणिकपणे व सेवाभावी वृत्तीने समाजसेवेचे व्रत हाती घेतले . या सेवाभावी वृत्तीमुळे जनसामान्यांमध्ये त्यांनी अभिमानाचे, आदर्शवादी व प्रेरणादायी असे स्थान निर्माण केलेले आहे.

इतकेच नव्हे तर इचलकरंजी को-ऑप. स्पिनिंग मिल, जवाहर शेतकरी सह. साखर कारखाना अशा अनेक सहकारी संस्था यांच्या अनमोल मार्गदर्शनामुळे उदयास येवून नावारुपास आल्या. दत्ताजीराव कदम टेक्निकल इन्स्टिट्यूट सारख्या शैक्षणिक संस्थामधून सर्व गोष्टींचा परिपूर्ण अभ्यास करून शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटविला आहे.

महत्वाचा संदेश:

उत्कृष्ट सेवा देणेसाठी, आपला ग्राहक ओळखा (KYC) कागदपत्रे सदर करा. अधिक माहितीसाठी नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.

तक्रार निवारण केन्द्र

आपली काही तक्रार असल्यास आमच्याशी संपर्क साधा   अधिक वाचा

मराठी