Kallappanna Awade Ichalkaranji Janata Sahakari Bank Ltd.

केएआयजेएस बँकेचा इतिहास

इचलकरंजी पूर्वीचे जहागिरीतील शहर. जहागीरदार कै. श्रीमंत नारायणराव बाबासो घोरपडे यांचे प्रयत्नाने महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणुन नांव लौकिक प्राप्त झालेले आजचे शहर. इचलकरंजी या शहराचा कायापालट करण्याचा ध्यास घेतलेल्या अनेक नेत्यांनी व कार्यकर्त्यानी त्याचे पूर्तीसाठी केलेल्या कार्याचे दृश स्वरूप म्हणजे उद्योग धंदयाने गजबजलेले आजचे इचलकरंजी शहर.या शहराचा विकास करण्याचा व उद्योग धंदा वाढविण्याचा ध्यास घेतलेले व चंग बांधलेले सहकार महर्षि कै. कदम आण्णा, त्यानी सहकाराशिवाय तरणोपाय नाही हे त्यांच्या दूरदृष्टीने त्याकाळी चूक जाणून अनेक सहकारी संस्थाची निर्मीती व उभारणी शहरातील अनेक मान्यवर नेत्यांच्या व कार्यकर्त्यांच्या सहकार्यातून केली. त्यांनी उभारलेल्या अनेक सहकारी संस्थांपैकी इचलकरंजी जनता सहकारी बँक लि.& ही एक होय. या बँकेचे नेतृत्व त्या वेळचे तरुण व विशिष्ठ ध्येयाने प्रेरित झालेले कार्यकर्ते म्हणजे माजी. खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, कै. मा. शंकरराव हुपरे यांचेकड़े सोपवीले. या बँकेचे प्राथमिक भाग भांडवल कै. मा. शंकरराव हुपरे चालवित असलेल्या ;गणेश भिशितुन जमा केले गेले आर्थिक गरजा भागवीणेसाठी भिशीसारखी योजना अपुरी ठरते हे अनुभवाने जाणून त्या जमलेल्या रक्कमेतूनच भाग भांडवल जमा करुन ही संस्था दि.०५/११/१९६२ रोजी रजिस्टर झाली व दि. ०७/१२/१९६३ पासून प्रत्यक्ष्यात कार्याला सुरवात झाली.बँकेचे व्यवहार, व्याप प्रगती बघून एप्रिल १९८२ मधे रिझर्व्ह बँकेकडून बँकिंग लायसेंस मीळाले.या सर्व प्रगतीला बँकेच्या स्थापनेपासून असलेले बँकेचे सर्व संचालक व सेवक यांची कर्तव्य दक्षता व अविरत श्रम कारणीभूत आहेत.

सुरवातीस सभासदांच्या आर्थिक गरजा विशिष्ठ मर्यादेपर्यंत भागविण्याचे धोरण ठरविले. आर्थिक गरजेच्या पुर्ततेसाठी व व्यवहारासाठी ठेवी गोळा करणे,इतर संस्थांकडून कर्जे मिळवीणे इत्यादी बाबी विचारात घेवून ठेवीच्या विविध योजना आखून त्यात सामान्य व्यक्तीचीही ठेव मिळेल अशा ठेव योजना राबविल्या. शहरातील इतर सहकारी संस्थांचे व्यवहार आमचे मार्फ़त सुरु केलेमुळे शिल्लक रक्कमा बँकेकडे ठेव रुपाने राहील्या. डेक्कन को. ऑप. स्पिनिंग मिल्स चे सूत वाटपाचे काम स्वीकारले, त्या करीता सभासदांना कर्जे उपलब्ध करुन दिली. जिल्हा मध्यवर्ती बँक, राज्य सहकारी बँक यांचे कडून कर्जे घेतली, त्या वेळी शहरात सुरु असलेल्या वस्त्रोद्योगाला यांत्रिक मागाच्या सहायाने आधुनीक स्वरूप देण्याचे प्रयत्न सुरु होते. बँकेचे उत्पादक सभासदांना स्वतःचा हातामागाचे यांत्रिक मागात रूपांतर करणेस बँकेने प्रथम आर्थिक सहाय्य दिले, त्या नंतर त्यांचा व्यवसाय उत्पादक या नात्याने स्वतःचे होणेचे दृष्टीने खेळते भांडवल पुरविणेसाठी हळू हळू व जस जशी बँकेची आर्थिक स्थिती स्थिर व भक्कम होत गेली तस तसे धोरणे आखली व अर्थपुरवठा केला.

बँका ह्या जनतेच्या आर्थिक जीवनाशी निगडित असल्याने बँकेचे व्यवहार व धोरण हे नेहमी लोकाभिमुख असणे गरजेचे आहे हे लक्षात घेवून या बँकेचे संचालक व व्यवस्थापन नेहमीच कार्यरत राहिले. कर्जवाटप करतांना सभासदांचे हित, उद्योग/ व्यवसायाची गरज, उत्पादक उद्योगाला प्राधान्य, राष्ट्रीय विकासाभिमुख धोरण ठेवले. शहरातील यंत्रमाग व्यवसायाचा/ उद्योगाचा अभ्यास केला,गरज विचारात घेतली, ती नियमांच्या चौकटीत बसवली व तदनुसार आर्थिक सहाय्य उपलब्ध करुन दिले, त्यामुळे यंत्रमाग व त्यांचे पूरक उद्योग निर्माण झाले. मजुरीचे काम करणारे यंत्रमागधारक, उत्पादक कारखानदार झाले. स्वतःच्या पायावर व्यवसाय उभा करण्याचे सामर्थ्य या बँकेने सभासदांना उपलब्ध करुन दिले. कर्तृत्ववान हाताला आर्थिक पाठबळ देवून त्यांना व्यवसायात स्थिर केले. समाजात त्यांची पत वाढवली. इचलकरंजी शहरातील बँकिंग क्षेत्रात या बँकेने सर्व प्रथम १९६३ साली हुंडी व्यवसाय सुरु करुन व्यापारी बंधुना अर्थसहाय्य उपलब्ध करुन दिले. जनता बँक ही जनमाणसांच्या हिताकरिता कसोशीने प्रयत्न करीत आहे हे दृष्य ज्यावेळी शहरातील जनतेपुढे आले त्यावेळी उत्स्फुर्तपणे जनतेने जनता बँकेला साथ दिली, बँकेवर विश्वास दाखविला. जिव्हाळा दिला. या विश्वास व श्रध्देवरच जनता बँक दिवसें दिवस वाढत राहिली. अधिक अधिक लोकांना सहभागी करुन घेवू शकली व लोकांच्या गरजा पूर्ण करु शकली, त्यामुळे जनता बँक ही केवळ सहकारी बँक न राहता जनतेची जिव्हाळ्याची, विश्वासाची,श्रध्देची बँक म्हणून पुढे आली. एक विचार, एकमेकातील सहकार्य व त्यामुळे सर्वांचा उद्धार या न्यायाने व बँकेबद्दल आत्मियतेने सर्व सभासदांनी सलग ५ वर्षे त्यांना मिळणांरा डिव्हिडंड न घेता तो इमारत फंडास वर्ग करण्याचा निर्णय घेवून तो अंमलात आणला. या सक्रिय सहकार्यतेमुळेच इचलकरंजी शहरात आमच्या बँकेची स्वतःची "जनता बँक भवन " ही पाच मजली भव्य वास्तु शहराच्या वैभावाची साक्ष व सहकारी भावनेचे मूर्तिमंत प्रतिक म्हणून उभी आहे. Howइचलकरंजी, कोल्हापुर,जयसिंगपुर, गांधीनगर, मुंबई, पुणे, गडहिंग्लज, सांगली, कराड, औरंगाबाद मुख्याने अर्थपुर्वठा केला जातो.बँकेने आपले कर्ज वाटपाचे धोरण आखतांना उत्पादकांना, कुटिरोद्योगांना व दुर्बल घटकांना प्राधान्यपूर्वक कर्ज वाटप केले आहे. त्यामुळे अग्रक्रम क्षेत्राकरीता ठरवून दिलेल्या कर्ज वाटपाचा कोटा आम्ही केंव्हाच पूर्ण केला आहे.

तसेच किमान व्याज आकारणी करीत असल्याने सभासदांना आपोआपच योग्य मोबदल्यात कर्ज उपलब्ध झाल्याने त्यांच्या उत्पादनात भरच पडत आहे व ते स्वावलंबी होत आहेत. बँकेच्या एकूण कर्ज पुरवठ्यापैकी ८२%कर्ज वाटप हे उत्पादक व व्यापार या कारणासाठी दिलेले आहे.

Development Of Industrial Sector

Recently our bank has co-opted by Small Industrial Development Bank of India for implementation of Technology up gradation Funds Scheme of 5% interest rate subsidy uncounted by the Central Govt. for the development of textile industrial sector. We are also financing for the development of S.S.I. units under the National Equity Funds Scheme as per the SIDBI Scheme.

Multi State Status

Bank has taken a decision regarding the expansion of its area of operation to provide banking services to Gujarath and Karntaka State. In this regard, we have got permission from R.C.S. Karnataka State and Maharashtra State. As such, we have taken over The Navkalyan Co-op. Bank Ltd., Hubli from Karnataka State and both branches are functioning in Karnataka State as on date.

Estd.: 7.2.1963 Regd. No. KPR/BNK/102/5.11.1962
RBI BANKING LICENCE NO. ACD .MH. 297 P. Dt. 27.4.1982.
AREA OF OPERATION The whole revenue area of Maharashtra State.
SCHEDULED STATUS 29 January, 2000.
केएआयजेएस मुख्य कार्यालय Main Road, ICHALKARANJI- 416 115
BRANCHES 44 Branches + H. O.
मराठी