Kallappanna Awade Ichalkaranji Janata Sahakari Bank Ltd.
मा. कल्लाप्पाण्णा आवाडे (दादा). संस्थापक अध्यक्ष
मा. कल्लाप्पाण्णा आवाडे (दादा) हे संस्थापक अध्यक्ष आहेत. ते ०७.०२.१९६३ पासून ०४.११.१९७६ पर्यंत अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यांनी त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत बँकेसाठी पूर्ण योगदान दिले. त्यांचे अथक परिश्रम व निरंतर प्रोत्साहन यांच्या माध्यमातून जनता बँक महाराष्ट्रातील सर्वात मोठी शेड्यूल्ड सहकारी बँक बनली आहे आणि आज कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता बँक म्हणून गर्वाने कार्यरत आहे. बँकेचा विकास व विकासाची गती यासाठी कल्लाप्पाण्णा आवाडे यांची जिद्द व प्रेरणा या गोष्टी महत्वाच्या आहेत.
श्री शंकरराव रामचंद्र हुपरे
०५.११.१९७६ पासून ०३.११.१९८५ पर्यंत बँकेच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी श्री शंकरराव हुपरे यांच्या खांदयावर होती. श्री शंकरराव हुपरे हे स्व. नारायणराव घोरपडे यांचे शिष्य होते. ते त्यांच्याप्रमाणेच गतिमान आणि उत्साही होते. इचलकरंजी तसेच संपूर्ण महाराष्ट्रभर बँकेचा विस्तार करण्यासाठी त्यांचे मोलाचे योगदान आहे.
श्री भूपाल बळवंत कागवाडे
हुपरे यांच्या नंतर बँकेची सर्व जबाबदारी भूपाल बळवंत कागवाडे यांच्या हाती देण्यात आली. त्यांनी २३.११.१९८५ पासून ०५.०९.१९९५ पर्यंत बँकेच्या अध्यक्ष पदावर काम पहिले आणि ३०.०८.२००५ ते ०९.०३.२००८ या काळ खंडासाठी ते पुन्हा नियुक्त झाले. व्यवस्थापन आणि बँकेची प्रगती व कर्मचारी यांच्या बद्धल सकारात्मक दृष्टीकोन यांच्या आधारे बँकेच्या विकासामध्ये त्यांनी महत्वाची भूमिका बजावली.
श्री द-याप्पा गुरुपादप्पा कोरे
श्री द-याप्पा गुरुपादप्पा कोरे हे ०६.०९.१९९५ पासून ०८.०२.१९९८ पर्यंत अध्यक्ष होते त्यांच्या कारकीर्दीमध्ये बँकेसाठी त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. बँकेच्या प्रगतीमध्ये त्याचे कार्य मह्त्वाचे आहे.
श्री अशोक बाळकृष्ण सौंदतीकर
०९.०२.१९९८ पासून १९.०८.२००५ पर्यंत अध्यक्षता स्वीकारली होती. त्यानंतर १०.०३.२००८ रोजी पुन्हा अध्यक्ष पदासाठी नियुक्त झाले ते आजतागायत बँकेच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी यशस्वीपणे आणि प्रभावीपणे हाताळत आहेत. सहकारी बँकांमध्ये ते एक अनुभवी बँकर म्हणून सर्वांनाच ज्ञात आहेत. गरीब वर्गासाठी कर्ज उपलब्ध करून देण्या साठी आग्रही, आर्थिक स्थिरतेसाठी निरंतर प्रयत्न, बँकेमध्ये अद्यावत तंत्रज्ञान लागू करण्यासाठी प्राधान्य या सर्व गोष्टी बँकेचा विकासफलक सहजच सांगून जातो.
श्री. प्रकाश आवाडे
श्री. प्रकाश आवाडे (पूर्व वस्त्रोद्योग मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांनी दि. २६.०२.२०१८ रोजी क्ल्लाप्पाणा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या चेअरमन पदाची सूत्रे स्विकारली. श्री. प्रकाश आवाडे हे इचलकरंजीतील प्रतिष्ठीत नागरिक आहेत. महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री असताना श्री. आवाडे साहेबांनी वस्त्रोद्योग व्यवसायाला नवसंजीवनी मिळवुन देण्यासाठी कसोशीने व तळमळीने प्रयत्न केले. एवढेच नव्हे तर २३ कलमी योजना राबविली, जेणे करून वस्त्रोद्योग व्यवसायाला पुर्नजीवन प्राप्त झाले. याच बरोबर त्यांनी पारंपारिक यंत्रमाग व्यवसायाला नवे स्वरूप देऊन त्यामध्ये वेविध्यता आणली व यंत्रमाग व्यवसायाला मूल्यवर्धित व्यवसाय म्हणुन नावारूपास आणले.
श्री. आवाडे साहेबांचे इचलकरंजी शहराचे पूर्वकडील मॅंचेस्टर हे रूप बदलून हाय-टेक सिटी मध्ये रुपांतरीत करण्याचे स्वप्न जागतिकीकरणामुळे सत्यात उतरले आहे. श्री. प्रकाश आवाडे यांच्या अथक प्रयत्नांमुळे इचलकरंजी शहरामध्ये यांत्रिकीकरण घडुन आले असून, इचलकरंजी शहर हे देशातील शटललेस लुम्सचे सर्वात मोठे केंद्र झाले आहे. श्री. आवाडे साहेबांनी इचलकरंजी शहर व परिसरातील २०० एकर जागेत टेक्सटाईल पार्क आणि औद्योगिक इस्टेट उभारण्याची महत्वाकांक्षी योजना राबविली आहे ज्यामुळे इचलकरंजी शहर हे आधुनिक वस्त्रोद्योगाचे केंद्रबिंदू बनले असुन येथे तांत्रिक व अत्याधुनिक पद्धतीने वस्त्र निर्मित केली जाते.
उत्कृष्ट सेवा देणेसाठी, आपला ग्राहक ओळखा (KYC) कागदपत्रे सदर करा. अधिक माहितीसाठी नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.
आपली काही तक्रार असल्यास आमच्याशी संपर्क साधा अधिक वाचा